भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी जि प प्राथमीक शाळा मुले मुली न्यू इंग्लिश स्कूल , प्राथमिक आरोग्य केंद्र , पशु वैद्यकीय दवाखाना,तलाठी कार्यालय , अमृतधारा दूध डेरी , गोरस दूध डेअरी,विविध कार्यकारी सोसायटी या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच रणजीत जाधव उपसरपंच नितीन शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच व विविध संघटनांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ तसेच सर्व शाळातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जि प प्राथमीक शाळांना बसवलेल्या लेझीमाचा भारदार कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयासमोर सादर करण्यात आला.खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.