सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी ठीक 3:30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
समन्वयक पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष माजी प्रांतपाल लायन डॉ. गुलाबचंद शहा व व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर १ ला. राजेंद्र शहा कासवा, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राचार्य. के पी मंगळवेढेकर लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्काराने वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर चे प्राचार्य. डॉ. संतोष कुमार कोटी यांना रोख रक्कम रुपये 11000 /- व स्मृतीचिन्ह,शाल, श्रीफळ देऊन गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अतिथी,प्रमुख वक्ते इचलकरंजीचे साहित्यिक प्रा. अशोक दास भूषवणार आहेत. सदर कार्यक्रम लायन प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव ला.दीनानाथ धुळम, कोषाध्यक्ष ला.सी.ए श्रेणिक शहा यांच्या उपस्थितीत समस्त लायन्सचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षकवृंद इत्यादींच्या समवेत संपन्न होणार आहे.अशी माहिती लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून देण्यात येत आहे.