पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस के एन सिंहगड कॉलेज कोर्टी पंढरपूरच्या विद्यार्थ्यांनी दिनांक ९ जुलै 2025 रोजी पालखी तळ स्वच्छता मोहीम हाती घेतली याची माहिती सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. वारीनंतर पालखीतळ स्वच्छतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने सिंहगड कॉलेज पंढरपूरचे 50 यांनी वारीनंतर पालखी स्वच्छता मोहीम राबवली त्यामध्ये ओला कचरा सुका कचरा चे व्यवस्थापन केले गेले आणि स्वच्छतेचा संदेश सर्वांसमोर मांडला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर एनएसएसचे विभागीय समन्वयक डॉक्टर संजय मुजमुले यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय सेवा योजना सिंहगड कॉलेज पंढरपूर चे कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख व राष्ट्रीय सेवा योजना सिंहगड कॉलेज चे प्रेसिडेंट अथर्व कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी झाला.