पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील यूनियन बँक ऑफ इंडिया भोसले चौक येथे वतीने वारकऱ्यांना फराळाचे वाटप संजय जाधव शाखाधिकारी पंढरपूर यांच्या हस्ते राजगिरा लाडू पैकेट , पाणी बॉटल, केळी, फराळी चिवडा आदि वस्तूंचे वाटप करण्यात आले.
यावेळी गणेश सावंत,अंजली धामगाये,राजू सोनवणे, सुष्मिता सोनवणे, आदिती बाबले, भागवत डावरे, शिवाजी पोरे, आनंद देवकर, वैभव सोनवणे, चिमाजी व सहकारी यांनी सहकार्य केले.
यावेळी वारकऱ्यांनी बँकेच्या उपक्रमा विषयी समाधान व्यक्त करून बँकेचे आभार मानले व पुढील प्रगतीस शुभेच्छा दिल्या.