राष्ट्रीय अध्यक्ष महेश ढवळे यांनी घेतली भेट
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आज श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी व पूजेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यांना दिनांक 23 व 24 जुलै रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे संत नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळाचे निमंत्रण आज दिनांक ६ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह येथे नामदेव महाराजांचे 17 वे वंशज गुरुवर्य निवृत्ती नामदास महाराज एकसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य अन्न आयोग अध्यक्ष महेश ढवळे एकसंघाचे राष्ट्रीय सचिव रुपेश खांडके, प्रदेश अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी देवेंद्रजी फडणवीस यांना संत नामदेव महाराजांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले असून दिनांक 23 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले आहे असे एकसंघाच्या प्रदेश अध्यक्ष गणेश उंडाळे यांनी नुकतेच सांगितले.