पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
रविवार दि.०६/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर “श्री रूक्मिणी” मातेची सपत्निक पुजा करणेचे भाग्य आज लाभले व श्री विठ्ठलाची मनोभावे सेवा केलेचे फळ आज मला व माझे कुटुबीयांना मिळाले. अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी तेज न्यूजला दिली.
सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर श्री संभाजी शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग, म्हणून श्री विठ्ठल भक्तांची सेवा सदैव माझे कडून अशीचे घडत रहावी अशीच मागणी श्री विठ्ठल व माता रूक्मिणी यांचे कडे केली व आज माझ्या जिवनाचे सार्थक झाले. पुजा संपन्न झाली त्यावेळी मा. मंत्री महोदय श्री गिरीष महाजन, समिती सदय जळगांवकर महाराज व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.