भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देवशयनी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पंढरपूर तालुका उपप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सरपंच रणजीत जाधव आनंद देशपांडे दादा आगलावे जालिंदर शिंदे सुधीर गांधी रवींद्र कारंडे सुनील माने महेश शिंदे गणेश मायणीकर मोफत नागणे अमोल लंगोटे अंकुश गोरे प्रशांत माळवदे नाना जाधव विठ्ठल लोखंडे राजू बिडवे महेश शिंदे आदि उपस्थित होते.
यावेळी महापूजा नंतर अमोल महादेव कारंडे यांच्यावतीने साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.रात्री भजनाच्या कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरातील महिला लहान मुले व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.