सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोलापूर जिल्ह्यातील तालुका पातळीवर कायदेशीर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी विधीज्ञांना अर्ज करण्याचे आवाहान
"द जर्नलिस्ट असोसिएशन" (दिल्ली) अंतर्गत कार्यरत असलेल्या "राष्ट्रीय कायदेशीर कक्ष" नॅशनल लिगल सेलच्या सोलापूर जिल्हा समितीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पातळीवर स्वेच्छेने काम करण्यासाठी इच्छुक असणा-या विधीज्ञा कडून अध्यक्ष आणि सचिव पदासाठी अर्ज मागविण्यात आहेत.
तमाम विधीज्ञांना राष्ट्रीय पातळीवर या मोहिमे अंतर्गत सामाजीक बांधीलकी म्हणून काम करण्याची नामी संधी उपलब्ध होणार असून याचा उद्देश कायदेशीर जागरूकता वाढवणे, पत्रकारांच्या कायदेशीर हक्कांचे संरक्षण करणे आणि सामाजिक न्यायाची भावना निर्माण करणे तसेच संरक्षण व संवर्धन करणे आहे.याकरिता पद व पात्रता खालील प्रमाणे
🔹 पद: तालुकानिहाय अध्यक्ष / तालुका सचिव
🔹 पात्रता: कायदा पदवीधर
🔹 पसंती: पत्रकारिता आणि सामाजिक कार्यात सक्रिय सदस्यांना प्राधान्य
🔹 अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 ऑगष्ट २०२५
🔹 मुलाखतीची तारीख: 3 ऑगष्ट २०२५ (रविवार,सकाळी ११:०० वाजता)
"इच्छुक विधीज्ञांनी त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह अर्ज सादर करावेत. निवडीसाठी विहित केलेल्या निकषांनुसार पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल." विधीज्ञांना अर्ज करण्याचे आवाहान नॅशनल लिगल सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड. शिवाजी कांबळे यांनी केले आहे.
संपर्क: अॅड. शिवाजी शा. कांबळे जिल्हाध्यक्ष , राष्ट्रीय कायदेशीर कक्ष ( नॅशनल लिगल सेल )"द जर्नलिस्ट असोसिएशन" दिल्ली, मोबाइल: 9922246123
पत्ता_पिस पॅराडाईस बिल्डींग, नदाफ डेंटल हॉस्पीटलच्या वर, तिसरा मजला, चेंबर नंबर ९, जिल्हा न्यायालया समोर, फाईव्ह स्टार हॉटेल जवळ, सिध्देश्वर पेठ, सोलापूर ,४१३००३