डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर तेज न्यूज
'रक्षाबंधन'भाऊ बहिणीच्या अतुट नात्याचा सोहळा.हाच पवित्र सण जनजागृती सेवा संस्थेच्या माध्यमातून सीमेवर आपले रक्षण करणाऱ्या जवानांना राखी पाठवून साजरा करत आहे.जनजागृती सेवा संस्था ग्रुप वरील सर्व भगिनींच्या वतीने प्रत्येकाची एक राखी नाव नंबर सहीत या सर्व राख्या सीमेवर रक्षण करणाऱ्या फौजी बांधवांना पाठवत आहोत.
जनजागृती ग्रुप वरील६५भगिनींच्या६५राख्या भाजप डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर यांजकडे संस्थचे खजिनदार दत्ता कडुलकर व सहखजिदार सौ.श्रुती उरणकर,सौ.सविता ठाकूर,सौ.नुतन यादव यांनी मंडल कार्यालयात सुपूर्त केल्या.जनजागृती सेवा संस्था पुढाकार घेऊन भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ यांच्या माध्यमातून या राख्या पाठवत आहोत.हा उपक्रम आपण निःशुल्क करत आहोत.सीमेवरील आपले जवान कणखर हातात रायफल घेऊन रक्षण करत आहेत, त्या हातावर आपली राखी बांधली जाणार आहे,याचा सर्व भगिनींना सार्थ अभिमानच असेल.ज्यांनी आपल्या माता भगिनींचे सिंदुर राखल, (ऑपरेशन सिंदूर)या रक्षाबंधनाला त्यांचा सन्मान करुया! सर्व राख्या सीमेवर रवाना झाल्या आहेत.
रक्षाबंधन उपक्रम संकल्पना संस्थेच्या सहखजिदार सौ.श्रुती उरणकर यांची तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार दत्ता कडुलकर यांचे विशेष परिश्रम व सहकार्य लाभले.त्यांचे जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.