करकंब प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम करकंब आणि करकंब पोलीस स्टेशन वतीने या वृक्षसंवर्धन करणाऱ्या वृक्षप्रेमी यांचा हरित वारी निर्मल वारी अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रम राबविले बद्दल तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने गेल्या साडेतीन वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी काम करत असलेल्या जवळपास १००० झाडांचं यशस्वी वृक्षारोपण करत असताना अतुल कुलकर्णी यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता लावलेल्या लेकीच्या झाडांची संताच्या झाडांची पहाणी करत कौतुक करत असलेल्या कार्याची दखल घेत आज सोलापूर येथे संवाद सभागृह येथे आय.पी.एस.अधिकारी अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधिकारी प्रितम यावलकर , पोलीस उपअधिक्षक गृह विजयालक्ष्मी कुरी,तसेच करकंब पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी सागर कुंजीर यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देऊन संंकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे, विश्वजीत शिंदे,बापू खारे, विशाल बोधे, देविदास काटवटे अमोल शिंदे आदींना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांनी आषाढी एकादशीच्या वेळी अतिशय सुंदर काम करत वारी यशस्वी केली.कोणकोणत्या अडचणी आल्या यावर मार्गदर्शन केले.तसेच आषाढी एकादशीच्या निमित्ताने ज्या ज्या संस्थांनी,व्यक्तिंनी,अनमोल योगदान दिलं त्यांचाही सन्मान पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान समस्त करकंबकरांचा.वृक्षदात्यांचा,तसेच लेकीच झाड टीम वृक्षप्रेमींचा आहे.या सन्मानामुळे नक्कीच आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण होते आहे.