अंधेरी प्रतिनिधी उदय वाघवणकर तेज न्यूज
अंधेरी (पूर्व) येथील पी.एम.जी.पी कॉलनी मधील मनमिळाऊ सामाजिक कार्यकर्ते मनमोहन मुकुंद मुळे ह्यांच्या अनमोल कार्याची दखल घेऊन दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीच्या वतीने सर्व धर्म समभाव व्यक्तिमत्त्व मनमोहन मुकुंद मुळे यांना भारतरत्न श्री बाबा साहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार जाहीर झाला असून मनमोहन मुकुंद मुळे यांना हा पुरस्कार १३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात येणार आहे .