पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी यात्रा कालावधीत भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदिर समितीकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली.
यावेळी स्वच्छतागृहाची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतागृह कायमस्वरूपी स्वच्छ राहील तसेच मुबलक पाण्याचा पुरवठा उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच चंद्रभागा नदी पात्रात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने बोटीतून पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपस्थित होते.