आषाढी वारीसाठी आलेल्या हजारो भाविकांनी घेतला लाभ
पंढरपूर /प्रतिनिधी तेज न्यूज
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेशदादा फाटे आणि फाटे उद्योगसमूह यांच्यावतीने आषाढी वारीनिमित्त आलेल्या भाविकांसाठी सलग दोन दिवस अन्नदान करण्यात आले. तर देवशयनी आषाढी एकादशी दिवशी फराळाचे वाटप करण्यात आले.
सदरचे महाप्रसादाचे वाटप कोर्टी रोडवरील फाटे ट्रॅक्टर्स या ठिकाणी करण्यात आले होते. फाटे कुटुंबाची आषाढी वारी निमित्त अन्नदान करण्याची प्रथा ही गेले अनेक वर्षे चालू आहे.
या महाप्रसाद व फराळ वाटपाचा परतीचा प्रवास करणाऱ्या पायी दिंडी व पालखी सोहळ्यातील भाविकांनी हजारो विठ्ठल भक्तांनी लाभ घेतला. त्यांच्यासह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या सर्वच भाविकांनी आस्वाद घेऊन समाधान व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मा. नागेशदादा फाटे,श्री विठ्ठल अर्बन मल्टीस्टेट संचालक संजय पवार,नवनाथ फाटे,संजय बागल ,शांतिनाथ बागल,अभिमान पवार टेलर, पैगंबर मुलाणी सर एकनाथ नाना फाटे, डाॅ माणिक मस्के,विनोद बागल सर, प्राध्यापक शरदचंद्र चट्टे सर, डॉ. रमेश फाटे, उमेश फाटे, शुभम फाटे ,निवृत्ती पाटील ,समाधान बागल ,समाधान कांबळे ऋषिकेश बागल ,औदुंबर माने वैजनाथ चौरे, संदीप रॉय, वसीम मुलानी ,शशांक फाटे, ओंकार फाटे ,सौदागर गिड्डे, गणेश बागल, बापूराव बागल, तुकाराम बागल व संचालक मंडळ व N P ग्रुप ऑफ कंपनीचा सर्व स्टाफ मान्यवर उपस्थित होते.

