धोंडेवाडीत प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषी दुतांने संरक्षण किट बाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात कृषी मित्रांनी शेतकऱ्यांना संरक्षण कीटकापासून होणारे फायदे सांगितले, तसेच किट न वापरल्यामुळे होणाऱ्या हानिविषयी माहिती सांगितली, तसेच किट वापरण्याचे आव्हान ही केले .यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते,
यावेळी कृषी मित्र मंगेश क्षिरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजीत खटके, शंतनू माळी, चैतन्य राऊत ,अविष्कार शिंदे यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमासाठी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे तसेच प्रा.एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वय) प्रा.एम एम चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) विषयतज्ञ प्रा.डी पी बरकडे यांचे मार्गदर्शन लाभले.