पंढरपूर. प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी क्वॉलिटी ऑफ सर्व्हिसेस इन कॉम्प्युटर नेटवर्क या विषयावर बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यानास द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असल्याची माहिती संगणक विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून श्री. राजेंद्र नवले यांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री. राजेंद्र नवले, कॅपजेमीनी, गुजरात येथे सिनियर सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून कार्यरत आहेत. या कार्यशाळेदरम्यान त्यांनी “कॉम्प्युटर नेटवर्कमधील क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस” या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस चा उपयोग ऑनलाईन शिक्षण प्रणाली, कॉर्पोरेट नेटवर्क, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणाली तसेच क्लाउड सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. क्वॉलिटी ऑफ सर्व्हिसेसमुळे नेटवर्कची कार्यक्षमता वाढते, महत्त्वाच्या सेवांमध्ये खंड पडत नाही तसेच सेवा दर्जा कायम राहतो. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये क्वालिटी ऑफ सर्व्हिसेस ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची असून ती नेटवर्कला अधिक विश्वसनीय, कार्यक्षम आणि वापरकर्त्यास उपयुक्त बनवते.
या व्याख्यानासाठी कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागामधून द्वितीय वर्षातील ७० विद्यार्थी उपस्थित होते.
या व्याख्यानाचे आयोजन प्रा. धनश्री भोसले यांनी केले. हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार डॉ. सुभाष पिंगळे यांनी मानले.

