सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
“ प्रथम श्रावण सोमवार व नागपंचमी सणानिमित्त प्रगती इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष नागनाथ कोप्पा सर व प्रमुख अतिथी म्हणून लायन प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी उपस्थित होते
सर्वप्रथम अतिथींच्या स्वागत सत्कारानंतर सर्व मुलांना लायन्स क्लब कडून खाऊ वाटप करण्यात आले.
याप्रसंगीपर सत्कारानंतर प्रा.स्वामीनाथ कलशेट्टी म्हणाले की, "पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमीचा सण उत्क्रांत समाजाच्या वाटचालीत उत्सवी आयुष्याचा सार शोधणारे सण आहे , भारतीय संस्कृतीत सण समांरभ, रूढी, परंपरा निर्माण झाल्या त्यामुळे मानवाच जगणं सुकर झालं.पण अलीकडच्या काळातील आधुनिकतेच्या झगमगटात भावनांची विभोर आवर्तने व्यक्त करणाऱ्या परंपरा, सण,समारंभ,सोहळे लुप्त होत असून,त्यातून मिळणारा निर्भेळ आनंद हरवत चाललेला आहे असेही म्हणाले. महाराष्ट्राच्या संस्कृतीत कृषिप्रधान समाजातील निसर्गपुजा बांधणाऱ्या नागपंचमी या सणाचे महत्व अधोरेखित करून पारंपरिकतेचं लेणं जपण्याचा प्रयत्न नागपंचमी सणाच्या” माध्यमातून केला जाणार आहे. अध्यक्षपदावरून बोलताना नागनाथ सरांनी लायन्स क्लबच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार मानले.
याप्रसंगी प्रशालेच्या संचालिका जयश्री कोप्पा ,गंगा बाळेकाई , वैशाली जवळेकर,प्रिया किणगी , कल्पना बडगोणार अंकिता चितळे ,सुनील अतनुरे क्लबचे काही सदस्य उपस्थित होते.