सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सरांच्या 10 व्या पुण्यतिथी निमित्त ड्रीम फाउंडेशन,डॉ कलाम कौशल्य विकास केंद्र व चाणक्य गुरुकुल आयोजित डॉ. कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी द्वारकाधीश मंदिर सभागृहात पार पडला.
यावेळी डॉ अशोक नगरकर वरिष्ठ वैज्ञानिक DRDO प्रमुख वक्ते पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ व्यंकटेश गंभीर वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख अतिथी व मार्गदर्शक प्रकाश राठोड मा सहायक आयुक्त तथा संस्थापक सेवा फाउंडेशन महाराष्ट्र ,एस व्ही सी एस संस्थेचे शंताय्या स्वामी, नितीन जाधव संचालक अनअकॅडमी विश्वनाथ सोनटक्के, नितेश वेदपाठक, गणेश इरकल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,संस्था यांचा डॉ कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल,फेटा व ग्रंथ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ अशोक नगरकर यांनी डॉ कलाम सरांच्या दूर दृष्टीतून आज भारत महासत्ता बनण्याच्या उंबरठ्यावर आहे,भारताचे अवकाश मोहीम असेल,संरक्षण क्षेत्र असो की विविध शैक्षणिक कार्य कलामांच्या प्रेरणेने सुरू आहे,डॉ कलाम सरांसोबत काम करताना खूप शिकण्यास मिळाले असे सांगून त्यांनी डॉ कलाम सर यांचे विचार यावेळी व्यक्त केले.
काशीनाथ भतगुणकी संस्थापक अध्यक्ष ड्रीम फाउंडेशन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश व्यक्त केला यावेळी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन झाले,कोल्हापूरचे केरबा पाटील,रुईचे इंद्रजित पाटील,सेवा फाउंडेशन चे प्रकाश राठोड ,म फुले विद्या संकुल पुणे चे डॉ व्ही,एस अंकलकोटे पाटील यांचे मनोगत झाले त्यात त्यांनी देशाच्या उभारणीत अनेकांचे योगदान असून डॉ कलाम सर व्यक्तिमत्व वंदनीय आहे त्यांचे विचार आजही प्रेरणा देते श्री व्यंकटेश गंभीर यांनी डॉ कलाम सरांची पुण्यतिथी विशेष प्रेरणा दिवस म्हणून यापुढे साजरा व्हावा असे मनोदय व्यक्त केले
या सन्मान सोहळ्यात शरण मठ संकुल अक्कलकोट,श्री रवि राठोड,प्रा प्रबुद्धचंद्र झपके,शशिकांत अकळवाड,उद्योजक शीतल गांधी,श्री अरुण तलिखेडे,श्री वीरभद्र यादवाड,श्री मल्लिकार्जुन पाटील,किशोर जाधव,संस्कार फाउंडेशन चे प्रमोद तमनावर,महारुद्र माडेकर,दत्तात्रय पाठक,सुधीर कडगंची, रूपा कणमुसे,भगवती गौरिमाता प्रश्नाला धोत्री, फर्जना बागवान यांच्यासह विविध मान्यवरांचे सन्मान झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वामिनाथ कलशेट्टी यांनी केले तर आभार संगीता भतगुनकी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेखर वाघमारे अनअकॅडमी सोलापूर सेंटर हेड सतीश पाटील,दीपा भुजबळ,सोनी राठोड,सिद्धाराम जोकारे,यांनी परिश्रम घेतले