अकलूज प्रतिनिधी तेज न्यूज
इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथे शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संस्थेच्या महत्त्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या कृषि मित्रांकडून ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
महाविद्यालयाच्या वतीने येथे कृषि कार्यानुभव कार्यक्रम पुढील सहा महिने राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत कृषिदुतांनी गावातील शेतकरी बांधवांना फुलांची रोपे देऊन सन्मानित केले. आणि शेतकरी बांधवांना पिकाच्या लागवडी पासून ते काढणीपर्यंत थोडक्यात माहिती दिली.
यावेळी निमगांव केतकी गावचे सरपंच मा.प्रविण डोंगरे, ग्रामविकास अधिकारी मा.लक्ष्मीकांत जगताप, कृषी सहाय्यक सौ.व्ही.एम.बोराटे,श्री संत सावतामाळी ट्रस्टचे अध्यक्ष अमोल राऊत, विनोद डोंगरे आणि समस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी रत्नाई कृषी महाविद्यालयाचे कृषीदूत स्वप्निल नाईकनवरे, प्रज्योत शिरढोणे, रोहित मगर, विवेक घुले, शेखर टापरे, श्रीराम फडतरे, प्रथमेश दुरगुडे, शिवराज निंबाळकर, गुरुदत्त भोसले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.संग्रामसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर.जी.नलावडे, प्रा.एस.एम.एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा.एम.एम.चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.


