सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलचा नूतन कार्यकारणी मंडळाचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह श्री. सिद्धेश्वर मंदिराजवळ येथे आयोजित करण्यात आलेला आहे. लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या नूतन अध्यक्षपदी प्रा स्वामीनाथ कलशेट्टी यांची निवड करण्यात आलेली आहे. ते श्री बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्थेतून नुकतेच सेवानिवृत्त प्राध्यापक असून, व्याख्याते, इतिहास अभ्यासक, निरूपणकार आहेत.विविध क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी आपल्या मातोश्रीच्या व आजोबांच्या स्मरणार्थ आपल्या सेवेच्या कालावधीत रक्तदान शिबिर, पाणपोई,शाळेतील मुलांसाठी पाण्याच्या टाक्या बांधून देणे,गणवेश वाटप,शालेय साहित्य वाटप,विविध गावातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण,मुले दत्तक योजना, गरिबांची दिवाळी, इत्यादी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम करण्यासाठी वर्षभरातून दोन महिन्याचे पगार या कार्यासाठी खर्च करत होते. शैक्षणिक सेवेबरोबरच सामाजिक,अध्यात्मिक, ऐतिहासिक व विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. म्हणूनच त्यांना जिल्हास्तर राज्यस्तरावरून विविध संस्थेकडून जवळपास 108 पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत. सरांचीं *आम्ही सेवा करतो* ही सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल कडून नूतन अध्यक्षपदावर निवड करण्यात आलेली आहे.तर सचिव पदी टर्किश टावेलचे उद्योग व्यवसायिक व इतर क्षेत्रांमध्ये तन-मन-धनाने काम करणारे श्री. दीनानाथ धुळम यांची निवड करण्यात आली. व कोषाध्यक्षपदी ख्यातनाम प्रा.सीए श्रेणिक शहा या अभ्यासू व्यक्तिमत्वाची निवड व त्याच बरोबर त्यांच्या नूतन कार्यकारणी यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा गुरुवार दिनांक 10 जुलै 2025 रोजी संपन्न होणार आहे. माजी प्रांतपाल लायन डॉ. गुलाबचंद शहा व माजी प्रांतपाल लायन अरविंद कोणसिरसगी यांचे मार्गदर्शन व इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून आत्तापर्यंत पुढील उपक्रम राबवण्यात आलेले आहेत.
त्यात डॉ. हेडगेवार रक्तपेढी रक्तगट पृथ:करण प्रयोगशाळेसाठी रुपये वीस लाखाची मदत,मागासवर्गीय मुलींसाठी वसतिगृह, अंध विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अक्कलकोट तालुक्यातील किणी येथे शंभर मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, डॉ. हेडगेवार रक्तपेढी येथे मोफत रुग्णवाहिका सेवा, सेठ सखाराम नेमचंद जैन हॉस्पिटल येथे सोनोग्राफीची सेवा, सोलापूर सहकारी रुग्णालयात सोनोग्राफी ची सोय, दरवर्षी प्राचार्य स्व. के.पी मंगळवेढेकर लायन्स गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा इत्यादी विविध उपक्रम क्लबच्या वतीने राबविण्यात आलेले आहेत.
या पदग्रहण सोहळ्यासाठी इन्स्टॉलिंग ऑफिसर (बेळगावचे) माजी प्रांतपाल लायन मोनिका सेठीया- सावंत, इंडक्शन ऑफिसर माजी प्रांतपाल लायन प्रा. प्रबुद्धचंद्र झपके या अतिथी बरोबरच मल्टिपल कौन्सिल व्हॉइस चेअरमन ला.ॲड.एम के पाटील, व्हाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर १ ला. राजेंद्र शहा कासवा, लायन डॉ. गुलाबचंद शहा, लायन अरविंद कोणसिरसगी, लायन जितेंद्र जोशी, लायन राजशेखर कापसे, याशिवाय रिजन चेअरमन ॲड. श्रीनिवास कटकूर,झोन चेअरमन ला.मीना जैन, प्रमुख अतिथी लायन मंगेश जोशी इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.अशी माहिती लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल कडून देण्यात येत आहे.