पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
ग्रामिण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रत्नाई कृषि महाविद्यालय अकलूज येथील कृषि मित्रांनी ड्रोन फवारणी बाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात कृषि मित्रांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीत होणाऱ्या सकारात्मक बदलांबाबत सविस्तर माहिती दिली. या वेळी शेतकन्यांना शेती मध्ये ड्रोन चा वापर, ड्रोन वापराचे फायदे, त्याच्या सरकारी योजना व अनुदान माहिती दिली.
या वेळी कृषिमित्र मंगेश क्षिरसागर, रामहरी डोंगरे, रोहन खरात, रणजित खटके, शंतनु माळी, चैतन्य राऊत, अविष्कार शिंदे यांनी माहिती सांगितली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे, अध्यक्ष मा. श्री. संग्रामसिंह मोहिते पाटिल, प्राचार्य - आर, जी. नलावडे . प्रा. एस. एम. एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक) प्रा. एम. एम. चंदनकर ( कार्यक्रम अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.