सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष 2025 2026 च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल चे पालक व सदस्य कारभारी तसेच स्कूलचे मुख्याध्यापिका नीता सोमवंशी उपस्थित होते. त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करून तसेच औक्षण करून वर्गात प्रवेश केला . फलकलेखन आणि वर्ग सजवण्यात आले. नीता मॅम यांनी सगळया वर्गात जाऊन मुलांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुलांसाठी कार्टून च्या माध्यमातून मुलांचे मनोरंजन करण्यात आले.
मुलांना शाळेकडून खाऊ वाटप करण्यात आले. या विशेष दिनानिमित्त श्री सिद्धेश्वर शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काडादी ,इतर मान्यवर तसेच मुख्याध्यापिका व इतर शिक्षक व कर्मचारी यांनी उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
एक प्रकारे मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलेले दिसले ते म्हणजे "स्कूल चले हम"......तर श्री सिद्धेश्वर इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापिका व इतर शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला.