जोगेश्वरी पूर्व गणेश हिरवे तेज न्यूज
गांधी बाल मंदिर हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक व एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांना नुकताच जोगेश्वरी पूर्वेतील अस्मिता शाळेतील हॉल मध्ये जॉय ऑफ गिविंग संस्थेच्या वतीने दहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे जोगेश्वरी भूषण डॉ एम डी वळंजू, कामगार नेते अविनाश दौंड, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आणि सामाजिक जाणीव ठेऊन काम करणारे जगदीश जायले, कुर्ला भूषण सत्येंद्र सामंत, डॉ महेश अभ्यंकर, कौन्सिलर ॲड रुषीला रिबेलो, ज्येष्ठ पत्रकार संपादक राजेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार कार्यक्रम छान रंगला.समाजकार्य, विद्यार्थ्यांना मदत , विविध समाज जनजागृती उपक्रम अभियान आयोजित करण्यात आले.
त्यांच्या या समाजकार्याचा सन्मान जॉय ऑफ गिविंग चे संस्थापक गणेश हिरवे त्यांचे पदाधिकारी यांच्यामार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक शिक्षक रवींद्र खोंडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.