कोरोची वार्ताहर तेज न्यूज
नागपूर येथे जानेवारी 2026 मध्ये होणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेलनला सर्वोत्परी प्रयत्न करू असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विश्व संमेलनाच्या लोगो अनावर प्रसंगी बोलत होते.
संत शिरोमणी नामदेव महाराज विश्व महासंमेल नागपूर येथे जानेवारी 2026 मध्ये आयोजित करण्याचे निश्चित झाले असून त्या संमेलनाचे लोगोचे अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे शुभहस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
महा सम्मेलनाला सर्वतोपरी सहकार्य करेन व पंढरपुर येथील नियोजित श्री संत नामदेव महाराज यांच्या स्मारकाबाबत लेखी निवेदन देण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र देऊन लवकर प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
यावेळी भास्कर टोंपे, संजयजी नेवासकार , ईश्वरज़ी धीरड़े, मा.अनंत जांगजोड़, महेश मांढरे, सातारा जिल्हा अध्यक्ष सुनील पोरे,डॉ.अज़यजी फुटाणे, राजुभाऊ किटे,प्रमोदजी कोरमकर,सुधर्मा खोडे,सुनिल जावरकार,दिपक नानोटकर, विलास धिरडे,किटेभाऊ चिमूर,प्रविणजी शिंत्रे,राजेशजी गंधे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.हा माहिती संतोष मुळे यांनी दिली.