माळशिरस प्रतिनिधी तेज न्यूज
तांबवे आबासो जगन्नाथ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ शशिकांत लक्ष्मण तांबे प्राचार्य बळीरामदादा बनसोडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय चळे, ता. पंढरपूर यांच्या मार्गदर्शनात रायगड जिल्ह्यातील माध्यमिक स्तरावरील आदिवासी विद्यार्थांना येणाऱ्या समस्यांचा चिकित्सक अभ्यास हे संशोधन कार्य पूर्ण केले आहे.
या संशोधन कार्यासाठी त्यांना शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी त्यांचे अभिनंदन करताना सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ दामा सर, प्रा डॉ हिरेमठ सर, प्रा.डॉ कांबळे सर,प्रा डॉ शिंदे सर, मार्गदर्शक प्राचार्य डॉ एस एल तांबे सर, अनिल तांबवे, नेताजी तांबवे, विठ्ठल बंडगर, बाळासाहेब तांबवे,श्री. विठ्ठल तांबवे सर, शहाजी गोफणे सर, पांडुरंग गोफणे सर, प्रशांत चोरमले सर,मोहन सावंत सर, अनिल काळे सर उपस्थित होते.तसेच विद्याप्रसारणी सभा चौक या संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. शोभाताई अविनाशरावजी देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. अविनाशरावजी देशमुख, संस्थेचे सचिव योगेंद्रभाई शहा, संस्थेचे उपकार्याधक्ष नरेंद्रभाई शहा यांनी ही तांबवे सरांचे या यशाबद्दल अभिनंदन केले, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.