अहिल्यानगर प्रतिनिधी नंदकुमार बागडे तेज न्यूज
जि.प.प्राथ .बाभुळगाव शाळेत आज प्रवेशोत्सव व गणवेश, पाठ्यपुस्तके वाटप कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.याप्रसंगी पंचायत समिती राहुरीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सकाळी सर्व विद्यार्थ्यांची वाजत गाजत प्रभातफेरी काढण्यात आली.इयत्ता पहिलीमधे दाखल होणा-या मुलामुलींचा यात सहभाग होता.शाळेच्या प्रवेशद्वारावर सरपंच मुक्ताबाई गि-हे, शाळा समिती अध्यक्ष दत्तात्रय कजबे, उपसरपंच दत्तात्रय ससाणे, रावसाहेब पवार, हरिभाऊ पाटोळे, सुधाकर वाघमारे, साईनाथ कदम, सचिन पाटोळे, गोरख कजबे ,पोलिस पाटील उमेश पाटोळे, अंबादास राऊत इ.ग्रामस्थ व शिक्षण प्रेमी नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन मुलांचे स्वागत केले.
उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके, बूट, साॅक्स यांचे वाटप मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
जि.प.शाळेतील शिक्षण हे सर्वांगीण असून मराठी माध्यमातून शिकणारे कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतात. यासाठी ग्रामस्थांनी शाळेचा पट वाढवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन मुंडे साहेबांनी केले.याप्रसंगी आपल्या आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ शाळेला प्रवेशद्वार बांधून देणारे बाळासाहेब साहेबराव हरिश्चंद्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. दातृत्वाच्या जोरावर विकासकामांना गती देणारे आदर्श नागरिक असतात अशांचा सत्कार करणे हे आमचे भाग्य असते असे गौरवोद्गार गावच्या सरपंच मुक्ताबाई गि-हे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
यावेळी साईनाथ कदम, रावसाहेब थोरात ,दत्तात्रय कजबे, गोरक्षनाथ गि-हे ,ग्रामविस्तार अधिकारी भोंदे भाऊसाहेव व पंचायत समिती कार्यालयाचे वरिष्ठ सहा.रवि मांडे यांनी शैक्षणिक कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक धर्मराज घुले यांनी केले तर रज्जाक सय्यद यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.