पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पतंजली योगपीठ व तालुका प्रशासनाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ११ व्याआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिनांक २१ जून रोजी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित योग सत्राचे आयोजन तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे करण्यात आले होते. या कार्यक्रम विविध स्तरांतील नागरिकांनी सहभाग घेऊन योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राचीन परंपरेचे मानसिक, आध्यात्मिक, बौद्धिक आणि शारीरिक फायदे घेण्यासाठी महसूल, पोलीस तसेच इतर शासकीय विभागाचे अधिकारी- कर्मचारी, उमा कॉलेजचे प्राध्यापक शिक्षक तसेच नागरिक उपस्थित होते. त्याचबरोबर प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे प्रामुख उपस्थिती होती.
यावेळी योग शिक्षिकांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले.