अकलूज प्रतिनिधी संजय निंबाळकर
श्री संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्रीन सिटी इंग्लिश मीडियम स्कूल वेळापूर येथे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीचे गुलाब पुष्प व पुष्पवृष्टी करून पहिल्या दिवसाचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
त्यावेळी शाळेच्या प्राचार्य प्रतीक्षा भडके यांच्या हस्ते सरस्वती व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर प्रार्थना राष्ट्रगीत झाले व सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले विशेष टेडी यांनी मुलांचे मनोरंजन केले.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सर्व विद्यार्थी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.