पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील वसंतराव काळे औद्योगिक संस्था धोंडेवाडी येथील वेल्डर, फिटर ,कोपा या ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी Taikisha Engineering India Pvt.Ltd कोंढापुरी ता. शिरूर जिल्हा पुणे येथील मध्ये नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे.
.Taikisha Engineering India Pvt.Ltd कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे या कंपनीचे एच .आर मॅनेजर रवींद्र करवंदे यांनी थेट मुलाखती द्वारे वसंतराव काळे आयटीआय कॉलेजमधील कोपा, वेल्डर ,फिटर या ट्रेडमधील प्रशिक्षणार्थीची निवड केली आहे . निवडीचे पत्र प्रशिक्षणार्थीना देण्यात आले आहे .
ट्रेड वेल्डर यामधील शंभूराजे नागटिळक, रोहन लामकाने, प्रवीण गाडे,निहाल मुलाणी, फिटर ट्रेड यामधील आदित्य चव्हाण ,ओंकार काळे, अधिक सरवदे, आकाश देठे, रोहित पवार, ओंकार सावळे,यशराज चव्हाण, व कोपा मधील सुशील नाईकनवरे निवड झालेल्या 12 प्रशिक्षणार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष कल्याणरावजी काळे, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे गुरुजी, प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले.