सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सोमवार दि. ९ जून पासून सोलापूर होटगी रोड विमानतळावरून सोलापूर ते गोवा ही फ्लाय -९१ विमान कंपनीची विमानसेवा सुरू होत आहे. गेली पाच वर्ष न्यायालयीन लढा देऊन विमानतळातील अडसर असलेली सिद्धेश्वर कारखान्याची अनधिकृत चिमणी हटवण्यामध्ये सोलापूर विचार मंचला १५ जून २०२३ रोजी अभूतपूर्व यश मिळाले. त्यापुढे त्यांच्या सातत्याने प्रयत्ना मुळेच आज सोलापुरातून पहिली विमानसेवा सुरू होत आहे.
सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या उद्घाटन सोहळ्यासाठी फ्लाय-९१ विमान कंपनीने सोलापूर विचार मंचच्या सर्व सदस्यांना खास निमंत्रण दिलेले आहे.
गेली पाच वर्षे आम्ही उभा केलेल्या लढ्यास आज मुर्त स्वरूप मिळाले व आज पासून सोलापूरच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशी सोलापूरच्या विकासाची परवणी पुन्हा सुरू झाली आहे. तमाम सोलापूरकरांसाठी आम्ही दिलेली ही अमूल्य ठेव आहे.
या संघर्षामध्ये ज्यांनी मदत केली त्यांचे आभार असे मत याचिका करते डॉ. संदीप आडके यांनी व्यक्त केले.
1. ०९ जून पासून सोलापुरातून विमान सेवेला 100% प्रारंभ . सोलापूर गोवा सोलापूर विमानसेवा फ्लाय ९१ कंपनी तर्फे सुरू करण्याची सर्व तयारी पूर्ण.
2. पुढील एक महिन्यांमध्ये स्टार एअर कंपनीतर्फे सोलापूर ते मुंबई उडान योजनेअंतर्गत विमान सेवा सुरू होईल व त्याचे तिकीट दर अंदाजे दोन ते अडीच हजार रुपये असतील.
3. यापुढे लवकरच हैदराबाद ,बेंगलोर व तिरुपती साठी सुद्धा विमान सेवा सुरू होईल.
4. या वर्षा अखेरपर्यंत नवी दिल्ली ,चेन्नई व आमदाबाद या ठिकाणी विमानसेवा देण्यासाठी भारतातील अग्रगण्य इंडिगो व इतर कंपन्यांना सोलापूर विचार मंच तर्फे सातत्याने पाठपुरावा चालू आहे व त्या सेवा सुद्धा लवकरच सुरू होतील.
5. होटगी रोड विमानतळाचे नुकतेच नूतनीकरण होऊन २९ सप्टेंबर २०२४ रोजी उद्घाटन झाले आहे व तेथे पूर्वीच्या दोन कमर्शियल विमानांच्या पार्किंग वरून सध्या चार विमानांचे एका वेळेस पार्किंग होईल इतपत विस्तारीकरण केलेले आहे. परंतु या पुढील विस्तारीकरणास एअरपोर्ट अथोरिटी व डीजीसीए कडून मंजुरी मिळालेली आहे व ते होऊन एका वेळेस तेरा विमानांचे पार्किंग व नवीन टर्मिनल उभारण्यात येईल.
गेली पाच वर्ष सोलापूर विचार मंचच्या माध्यमातून सोलापुरातील सर्वसामान्य लोकांनी होटगी रोड विमानतळातील प्रमुख अडसर असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी अनेक प्रयत्न करून 15 जून 2023 रोजी शासनास पाडण्यास भाग पाडली व तेथून पुढे सोलापूरचे विमानतळ नव्याने कार्यान्वित करून येथे येण्यासाठी भारतातील सर्व विमान कंपन्यांना आमंत्रित करून आज सोलापूर बहुप्रतिक्षित विमान सेवा सुरू करण्यामध्ये सोलापूर विचार मंचला अभूतपूर्व यश प्राप्त झाले आहे.