सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रलच्या सन 2025-26 या वर्षासाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. अध्यक्षपदी इतिहास अभ्यासक, व्याख्याते, समाजसेवक व निरूपणकार लायन. प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांची निवड झाली.
ही निवड माजी प्रांतपाल व क्लबचे मार्गदर्शक, संस्थापक अध्यक्ष लायन डॉ. गुलाबचंद शहा यांच्या अध्यक्षतेखाली, क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली.सचिवपदी लायन दीनानाथ धुळम तर खजिनदारपदी लायन सीए श्रेणिक शहा यांची नियुक्ती करण्यात आली.
या निवडीप्रसंगी एमजेएफ ला. अरविंद कोणसिरसगी, एम जे एफ.ला. मल्लिकार्जुन उदगिरी, एम जे एफ. ला. सीए चंद्रकांत रच्चा, एम जे एफ.ला.भावेश शहा, एम जे एफ.ला.नरेंद्रकुमार इंगळे, सल्लागार लायन डॉ. शिरीष कुमठेकर, रिजन चेअरमन श्रीनिवास कटकूर, रिजन सेक्रेटरी चंद्रकांत यादव, झोन चेअरमन विठ्ठल सारंगी, अध्यक्ष चक्रधर अन्नलदास, प्रथम उपाध्यक्ष केदार स्वन्ने, लायन हरिहर महिंद्रकर, लायन वैशाली यादव, लायन नंदिनी कटकूर, लायन गुरुराज यलट्टी, लायन नागनाथ कोळा, लायन जितेंद्र नामा आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व आगामी वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.