फलटण प्रतिनिधी तेज न्यूज
ओमसाई व ज्ञानज्योती लोकसंचलित साधन केंद्र, फलटण.दिनांक ११/०६/२०२५ स्थळ - नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे सामाजिक कार्यकर्ते अजित जाधव यांचा शाल, श्रीफळ,प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा (माविम)(महाराष्ट्र शासन अंगिकृत) नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रम जेंडर व न्युट्रीशन या घटकाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते अजितकुमार जाधव यांना महिला बचत गट, महिला सक्षमिकरण, स्त्री पुरुष समानता या विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सुधारक सन्मान पुरस्कार २०२४-२५ ने सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अजित जाधव यांचे अभिनंदन केले जात आहे.तेज न्यूज चॅनलच्या वतीने ही त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन