पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे तेज न्यूज
काल भंडीशेगाव रोडवरून आनलेल्या लाल पांढरा व गुलाबी बोगनवेल कागदी फुलांच्या काड्या पासून श्रमदानातून 170 रोपे तयार करण्यात आली.
त्याग, समर्पण, जाणीव,समाजाचे उपकार निसर्गाचे देणे, गावा विषयी प्रेम,नव युवकांना रोजगार, प्रेरणा, निसर्ग सौंदर्य निर्मिती.वनराई या सर्व गोष्टींचा समावेश श्रमदानातून कृतित होतो.आपल्या वैयक्तिक जीवनातून वेळ काढून समाजासाठी करण्यासारखे खूप काही आहे.जिवनाचा उपयोग स्वपरिवारासाठी करीत असताना.दुसऱ्यासाठीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात करावा.तरच जिवन सुंदर आहे.
आज आम्ही जि रोपे तयार केली त्यासाठी फक्त पिशविचाच खर्च आहे.बाकी सर्व फुकट मिळाले आहे.याचेच रूपांतर उद्या निसर्ग सौंदर्यात होणार आहे याचा आनंद आम्हाला आहे. अशी माहिती विलास श्रीरंग भोसले माजी पोलीस अंमलदार 9923433535 यांनी तेज न्यूज चॅनला दिली.