सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
२१ जून, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोलापूर होटगी रोड विमानतळावर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ने आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग शिबिराचे आयोजन केले होते . त्यानिमित्त योग प्रशिक्षक उन्मनी जांगे, जोस्ना दुसाल व अभय दुसाल यांनी विमानतळावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज सकाळी सहा ते सातच्या दरम्यान योगाचे प्रशिक्षण दिले. सर्व सहभागी कर्मचाऱ्यांना प्रमुख पाहुणे व सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके व डॉ. डायना आडके यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर विमानतळाच्या प्रमुख अंजनी कुमारी यांनी योग प्रशिक्षक उन्मनी जांगे ,जोस्ना दुसाल , डॉ. संदीप आडके व डॉ. डायना आडके यांचे स्वागत केले. या योग शिबिरात सोलापूर होटगी रोड विमानतळावरील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स नी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
मानव संसाधन विभागाचे प्रबंधक दीपक केलूस्कर यांनी आभार प्रदर्शन केले व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी अंजनी कुमारी सोलापूर विमानतळ प्रबंधक व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.