सांगोला प्रतिनिधी तेज न्यूज
फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूलचा १० वी सीबीएसई बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला असून फॅबटेक पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली.
सीबीएसई बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या १० वी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत सलगत तीन वर्ष फॅबटेक पब्लिक स्कूलचा निकाल शंभर टक्के लागत असुन यावर्षी ही यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
यावर्षी फॅबटेक पब्लिक स्कूल मधील प्रथम क्रमांक कुमारी प्राची देसाई (९५.००%), द्वितीय क्रमांक मिताली यमगर व कु. सचिन गुळमिरे (९१.००%) आणि तृतीय क्रमांक कृष्णा विटेकर (८९.००%) गुण प्राप्त करून घवघवीत यश संपादन केले आहे.
फॅबटेक पब्लिक पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांना देणारे येणाऱ्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे स्कूल मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहेत.
त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पब्लिक स्कूलचे प्राचार्य सिकंदर पाटील आदींसह पब्लिक स्कूल मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.