मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
ठाणे येथील सिव्हिल इंजिनिअर वेदश्री सावंत यांनी सोमवार दिनांक १२ मे रोजी आपला मुलगा अवधूत सावंत याचा वाढदिवस पनवेलच्या वनवासी आश्रमात साजरा केला.
यावेळी जॉय ऑफ गिव्हिंगचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील, कार्यकारी अभियंता प्रदीप पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वैजयी पाटील हेदेखील उपस्थित होते. गरीब, गरजू मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या वेदश्री सावंत नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी मदत देण्याचा प्रयत्न करतात. वनवासी आश्रमात जवळपास ४० मुले कठीण परिस्थितीत शिक्षण घेत असल्याची माहिती त्यांना जॉयचे वैभव पाटील यांचेकडून मिळाली.
आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना आपल्याकडून सहकार्य व्हावे व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरावा यासाठी त्यांनी ह्या आश्रमासाठी सहाय्य करण्याचे ठरवले व त्यानुसार सोमवार दिनांक १२ मे २०२५ रोजी वनवासी आश्रमात मुलगा अवधुतसह उपस्थीत राहून आश्रमासाठी तांदूळ, गहू, चनाडाळ, तूरडाळ, मिक्स कडधान्य, साखर इत्यादी किराणा सामानाची भेट दिली. कार्यकारी अभियंता प्रदीप पाटील यांनीदेखील मागील आठवड्यातील आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत आश्रमासाठीच्या ह्या मदतीत योगदान दिले. आदिवासी, गरजू मुलांच्या पालणपोषणासाठी मुलाच्या वाढदिवसाचे निमित्त साधून मदतीचा हात देऊन अभियंता वेदश्री सावंत यांनी एक स्तुत्य व अनुकरणीय पायंडा समाजात निर्माण केला असून त्यांच्या ह्या सहयोगासाठी वनवासी आश्रमाचे केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
समाजातील गरीब, गरजू, दुर्गम व दुर्लक्षित घटकांच्या मदतीसाठी अधिकाधिक संवेदनशील व्यक्तींनी पुढे येऊन त्यांचे खडतर जिवन सुलभ करण्यासाठी यथाशक्ती योगदान देणे गरजेचे असल्याचे मत वैभव पाटील यांनी व्यक्त केले.