नाशिक प्रतिनिधी तेज न्यूज
वसंत व्याख्यानमाला, नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृती व्याख्यानानिमित्त अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ (नवी दिल्ली) चे राष्ट्रीय अध्यक्ष भास्करराव टोपे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
हा सन्मान ओबीसी आणि जातीनिहाय जनगणना नेते छगनराव भुजबळ व बारा बलुतेदार संघटनांचे नेते अरुणभाऊ नेवासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अनंतराव जांगजोड यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व उपस्थित जनसमुदायाचे साक्षीने हा गौरव सोहळा पार पडला.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भास्करराव टोपे यांनी आगामी संत नामदेव एकात्मता विश्व महासम्मेलनास शुभेच्छा दिल्या. 5 लाख नागरिकांच्या सहभागाने पार पडणाऱ्या या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. “मी स्वतः या महासम्मेलनासाठी उपस्थित राहीन,” असे अभिवचनही भुजबळ यांनी दिले.
हा कार्यक्रम समाज एकात्मतेचा संदेश देणारा ठरला असून, सामाजिक समतेसाठी झटणाऱ्या सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र मुख संघटक संतोष मुळे यांनी दिली