पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
शिक्षणासाठी आपले घर हे पहिले शिक्षणकेंद्र असून व्यावहारिक जीवनात आपण यशस्वी होण्यासाठी दर्जेदार शालेय शिक्षण घेणे खूप आवश्यक असल्याचे सांगून यातूनच आपले व्यक्तिमत्व विकास, मानसिक कौशल्य व शारीरिक शक्ती विकसित होत असते. आयुष्यभर आपण शिक्षक ,पालक, कुटुंबातील व्यक्ती व मित्र आणि संबंधित लोकांकडून नियमित शिकण्याची सवय अंगीकारली पाहिजे प्रत्येकाकडील एक चांगला गुण आपण अवगत करण्याचे आवाहन संस्था सचिवा सौ. सुनेत्राताई पवार यांनी केले असून आपल्या संस्थेतून चांगले उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आपली संस्था बांधील असून आपल्या शिक्षणाचा फायदा कुटुंब व समाजातील लोकांच्या विकासासाठी करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रारंभि रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापक सचिवा सौ .सुनेत्राताई पवार यांचे शुभहस्ते भगवान श्री सत्यसाई यांचे मातोश्री ईश्वराममा व छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
06 मे हा दिवस रुक्मिणी विद्यापीठाने " कर्मचारी दिवस "म्हणून साजरा करणार असल्याचेही यावेळी त्यांनी जाहीर करून रुक्मिणी विद्यापीठाच्या कर्मचारी वर्गासाठी उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार देणार असल्याचेही सांगितले.
यावर्षीचे उत्कृष्ट कामगार म्हणून प्रमोद लक्ष्मण हुंगे. लिपिक, माताजी निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर व आशाताई अवघडे. सेविका , अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर यांना रोख रक्कम ,शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले व हा पुरस्कार प्रत्येक वर्षी देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
तर या कार्यक्रमात मातोश्री ईश्वरामा जुनियर कॉलेज च्या एच. एस. सी. मार्च 2025 विशेष उत्तीर्ण झालेल्या विज्ञान शाखा चि. रेहान अतीक मुल्ला, चि. आदित्य घाडगे वाणिज्य शाखा शिंदे प्रसाद शंकरराव ,ढोकळे प्रफुल्ल गौतम. कला शाखा राजपाल नारायण रवी, सुडके कृष्णा तुकाराम यांचाही मान्यवरांचे शुभ हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी बोलताना संस्था संघटक रवींद्रजी साळुंखे यांनी सर्वांना एकसंघ राहून संस्था व विद्यार्थी प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचे शिक्षकांना आवाहन करून दर्जेदार शिक्षण देण्याचे सांगितले.
या कार्यक्रमात संस्था अंतर्गतच्या प्राथमिक, माध्यमिक विभागातील सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या शिक्षकांचे वसुधा कुंभार, मीनाक्षी भोसले, सुभद्रा पांढरे, सविता लोखंडे, जयश्री खडतरे ,फरहाणा कादरी यांचाही सन्मानचिन्ह शाल व साडीचोळी देऊन यथोचित सत्कार केला.या सेवानिवृत्त शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी संस्था संचालक युवानेते सुनंजय (दादा )पवार. अध्यक्ष, युवक काँग्रेस आय प्राचार्य. नंदिनी गायकवाड मुख्याध्यापक संतोष कवडे ,काशिनाथ गोगाव यांचे सह रुक्मिणी परिवार व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभावरी डुबल यांनी केले तर आभार सविता लोखंडे यांनी मानले
हा कार्यक्रम यशस्वीतीसाठी महेश भोसले ,काशिनाथ गोगाव, कुमुदिनी सरदार यांनी विशेष परिश्रम घेतले.