शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्यू.कॉलेज शेळवे येथे ई.दहावीच्या बोर्ड परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलेल्या सर्व गुणवंत,यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला,प्रसंगी या विद्यार्थ्यांचे माता आणि पिता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते,त्यांनी प्रशालेबद्दल अतिशय चांगल्या भावना व्यक्त केल्या तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपले सर्व गुरुवर्य,पालक यांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.
प्रशालेतील कु.वैष्णवी संतोष नागटिळक हिने 93.80% गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला,कु.संजीवनी आनंता श्रीखंडे हिने 92.80% गुणांसह द्वितीय तर कु. वैष्णवी तात्यासाहेब आसबे हिने 90.00% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच ओम विष्णू गायकवाड, अमित गजानन साळुंखे,गौरी संतोष लोखंडे व विराज विजय शिंदे इत्यादी विद्यार्थ्यांनी 80% च्या पुढे गुण मिळवून नेत्रदीपक यश प्राप्त केले,त्याबद्दल सर्वांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा सत्कार केल्यानंतर इयत्ता दहावी नंतर पुढे काय..? या विषयावरती प्रेरणादायी व्याख्याते तसेच मार्गदर्शक मुकेश वाडेकर यांनी उपस्थित पालक तसेच विद्यार्थी यांना अतिशय चांगले मार्गदर्शन केले,कार्यक्रम प्रसंगी उपस्थित समाधानभैय्या गाजरे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पहिल्याच वर्षी सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज शेळवे या प्रशालेने 100% निकाल देऊन 90% च्या पुढे तीन विद्यार्थी 80% च्या पुढे चार विद्यार्थी तसेच 60% च्या पुढे सर्व विद्यार्थी असा अतिशय उत्कृष्ट निकाल दिलेबद्दल पालकांनी सुद्धा प्रशालेचे भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमासाठी खेड भाळवणी गावचे ग्रामपंचायत सदस्य आण्णासाहेब पवार,तसेच संतोष नागटिळक,आनंता श्रीखंडे, तात्यासाहेब आसबे, गजानन साळुंखे, विष्णू गायकवाड,ज्ञानेश्वर साळुंखे, नवनाथ लोकरे, भाऊसाहेब लोकरे,महंमद मुलानी,शंकर दीक्षित,सौ.राणी विजय शिंदे,सौ.स्वरूपा गजानन साळुंखे,सौ.स्वाती संतोष लोखंडे, सौ.अश्विनी तात्यासाहेब आसबे,सौ.प्रियांका समाधान गाजरे इत्यादी उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी केले,तर आभार संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी मानले,संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन पार पाडले,उपक्रमशील शिक्षक मोहन गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले,तर फलक लेखन कला शिक्षक योगेश गायकवाड यांनी केले, प्रशालेचे सहशिक्षक राम मोकळे, कबीर शेख यांनी सत्कार समारंभाचे सुव्यवस्थित नियोजन पार पाडले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले गुरुजन, पालक परिवार व मित्र परिवार यांना पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.