पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर येथील विवेक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड संस्थेच्या सूचनेनुसार व प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली. त्यामध्ये चेअरमन पदी प्रशालेतील माध्यमिक विभागातील युवराज परचंडे , व्हाईस चेअरमन पदी कांचन टकले तर सचिव म्हणून राजेंद्र जाधव यांची संचालक मंडळांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीस बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ सचिव ॲड.वैभव टोमके सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
या निवडीच्या वेळी प्राचार्य डॉ. यु .आर.मुंढे ,दत्त विद्या मंदिर सुस्ते चे प्राचार्य पाटील एस .यु, मुख्य लिपिक मोरे एच.के. पर्यवेक्षक अशोक पवार, दराडे व्ही .एस.,शिनगारे आर .डी., वस्तीगृह अधीक्षक अमोल हुंगे, सुनीता नडगिरे उपस्थित होते. यावेळी नूतन संचालक राजकुमार ढगे, बाळासाहेब करपे, पोपट काळेल, विजय सावंत, दत्तात्रय निकम, प्राची खैरे, नितीन वायदंडे आणि विजय कर्णेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन संचालक मंडळ व पदाधिकारी यांचा सत्कार संस्था व प्रशालेच्या करण्यात आला.