पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिंहगड हॅकाथॉन 2K25 चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य के. जे. करांडे यांनी दिली. हा २४ तास नॉनस्टॉप चालणारा हॅकाथॉन २८ आणि २९ मार्च २०२५ रोजी पार पडला.
या हॅकाथॉनचे उद्घाटन श्री. शाम श्रीनिवास येमुल (इंटेलीसॉफ्ट कॉम्प्युटर कन्सल्टंट प्रा. लि., सोलापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्यासोबत प्राचार्य डॉ. के. जे. करांडे, उपप्राचार्य डॉ. एस. जी. कुलकर्णी, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. पिंगळे, हॅकाथॉन संयोजक प्रा. एन. एम. सावंत, विद्यार्थी समन्वयक गीता नवले आणि कुलदीप गोडसे उपस्थित होते.
या हॅकाथॉनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञान निर्मिती आणि संगणक विज्ञानाद्वारे नवकल्पना विकसित करणे यावर भर देण्यात आला. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये पीआयसीटी पुणे, केआयटी कोल्हापूर, व्हीआयआयटी पुणे, एडीसीईटी अष्टा सांगली, डब्ल्यूआयटी सोलापूर, स्वेरी पंढरपूर, एस.के.एन पंढरपूर तसेच सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. एकूण ६४ गटांतील ३२० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा. ए. ए. फाटक, प्रा. वाय. आर. कलशेट्टी (शैक्षणिक क्षेत्र) आणि श्री. विशाल लवटे (औद्योगिक क्षेत्र) यांनी परीक्षण केले.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आले:
🏆 प्रथम पारितोषिक ( रु. २५,०००) – कुयरकनेक्ट टीम, डब्ल्यू.आय.टी, सोलापूर चे विद्यार्थी. हे पारितोषिक महाविद्यालयाच्या वतीने प्रदान करण्यात आले.
🥈 द्वितीय पारितोषिक ( रु.१५,०००) – बायनरी ब्रेन टीम, के.आय.टी, कोल्हापूर आणि अल्गो माईंड टीम, एस.के.एन सिंहगड, पंढरपूर यांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तरित्या प्रदान करण्यात आले. हे पारितोषिक माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रदान करण्यात आले.
🏆 विजेत्या व उपविजेत्या संघांसाठी ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे इनरव्हील क्लब ऑफ पंढरपूर यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आली.
या हॅकाथॉन मध्ये विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यास प्रेरित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एन. एम. सावंत संयोजक यांनी उपस्थितांचे आभार मानले.