पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पंढरपूर येथे बुधवार दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाइन एक दिवशीय कार्यशाळा पार पडल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड हे आय. आय. आर. एस. इस्रो चे नोडल सेंटर आहे. या नोडल सेंटर द्वारे सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभागात ए.आय / एम.एल मॉडेलचा उपयोग विशिष्ट पिकांच्या क्षेत्रफळाचे नकाशे तयार करण्यासाठी या विषयावर आय.आय.आर.एस / इस्रो मार्फत ऑनलाईन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या ३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. विशिष्ट पीक क्षेत्र मॅपिंग साठी ए आय / एम एल मॉडेलच्या वापरामुळे उपग्रह प्रतिमा, यूएव्ही डेटा आणि प्रगत संगणकीय तंत्राचा वापर करून कृषी देखरेखी मध्ये क्रांती घडली आहे. यामुळे पिकांच्या प्रकारांचे अचूक वर्गीकरण आणि त्यांच्या स्थानिक व्याप्तीचा अंदाज घेण्यास मदत होते. विशिष्ट पीक क्षेत्र मॅपिंगसाठी ए. आय. एम. एल. मॉडेलच्या अपेक्षित परिणामांमध्ये वर्गीकरण अचूकता सुधारणे, वर्णक्रमय समानतेतील त्रुटी कमी करणे आणि हस्तलिखित सर्वेक्षण कमी करणे हे मुख्य हेतू या कार्यशाळेमध्ये मांडण्यात आले. तसेच ते रियल टाईम देखरेख सक्षम करतात, कृषी नियोजन / उत्पन्नास समर्थन देतात आणि शाश्वत शेती आणि अन्नसुरक्षा साठी निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात.
सदरील कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, नोडल सेंटर प्रमुख मिलिंद तोंडसे, कार्यशाळा समन्वयक अमृता माळी तसेच विभागातील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.