भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये अनुसूचित जाती महिला चे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
भाळवणी ग्रामपंचायतच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. या अगोदर लक्ष्मी यशवंत कुचेकर यांनी सरपंच पदी काम केले होते.
यावेळी ग्रामपंचायत निवडणुक दुरंगी होणार की तिरंगी लढत होणार याची चर्चा सुरू झाली आहे.