मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे तेज न्यूज
सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल वांद्रे मुंबई येथील ज्येष्ठ शिक्षिका सीमा जोसेफ यांच्या पुढाकाराने त्यांनी स्वतः पदरमोड करीत जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांना सांगून जोगेश्वरी विभागातील गोर गरीब वंचित कुटुंबियांना गुढी पाडव्याच्या मुहुर्त साधत किराणा सामान वितरीत करण्याची विनंती केली.
सीमा या सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या आणि उपक्रमशील शिक्षिका आहेत. मागील अनेक वर्षापासून हिरवे समाजातील उपेक्षित परिवारांना जॉय संस्थेच्या माध्यमातून किराणा सामान, शैक्षणिक वस्तू, आरोग्य किट उपलब्ध करून देत आहेत.त्यांचा या सकारात्मक कृतीचे समर्थन करीत शिक्षिका सीमा यांनी आपल्याला देखील वंचित लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे आहे असे हिरवे यांना सांगून किराणा वितरित करण्याची तयारी दर्शविली आणि हिरवे यांनी दहा कुटुंबांना पाडव्याच्या दिवशी सामान दिले.