अल्पवयीन मुलीस फूस लावून अपहरण करुन दुष्कर्म केल्याचे आरोपातून दोघांची तब्बल 6 वर्षाच्या कारावसानंतर निर्दोष मुक्तता
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपुर अल्पवयीन मुलीस फुस लावुन अपहरण करुन दुष्कर्म केल्याचे आरोपातुन संभाजी मधु कोकरे तसेच संदीप हौसेराव शेळके यांची पंढरपुर येथील मे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस बी देसाई साहेब यांनी निदर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, पिडीत अल्पवयीन मुलीस दिनांक ०८/०२/२०१९ रोजी रात्री ०७.०० वाजता रेडडे तालुका-मंगळवेढा, जिल्हा- सोलापुर येथुन कायदेशीर रखवालीतुन कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेले म्हणुन अज्ञात इसमाविरुध्द मंगळवेढा पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर ०५/२०१९ अन्वये दिनांक ०९/०२/२०१९ रोजी भारतीय दंड विधान संहिता कलम ३६३ तसेच बालकांचे लौगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८ व १२ अन्वये वर नमुद आशयाची फिर्याद पिडीतेची काकांनी दिलेली होती.
तदनंतर दरम्यानच्या काळात सदरकामी संभाजी मधु कोकरे तसेच संदीप हौसेराव शेळके यांना प्रस्तुत प्रकरणी संशयित म्हणुन अटक केलेली होती. तसेच सदरहु प्रकरणात भारतीय दंड विधान संहिता कलम ३६६,३७६ (२) (आय), १०९ तसेच बालकांचे लौंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ४२ तसेच मोटार वाहन कायदा १९८१ चे कलम १६१/१७७,२३६(१)/१७७ तसेच केंद्रीय मोटार वाहन कायदयाचे कलम ५१/१७७,१०२/१७७ या कलमांची वाढ केलेली होती.
तसेच सदर यातील संशयित संभाजी मधु कोकेरे हे प्रस्तुत कामी अटक झाल्यापासुन न्यायालयीन कोठडीमध्ये होते. तसेच सदरकामी यातील संभाजी मधु कोकरे तसेच संदीप हौसेराव शेळके यांचे विरुध्द दोषारोपपत्र मे. कोर्टात दाखल झालेले होते. तसेच सदरकामी सरकार पक्षातर्फे एकुण सात साक्षीदार तपासलेले होते. तसेच सदरकामी संभाजी मधु कोकरे व संदीप हौसेराव शेळके यांचे तर्फे केलेला अंतिम युक्तीवाद ग्राहय धरुन मे. कोर्टाने सदर यातील संभाजी मधु कोकरे व संदीप होसेराव शेळके यांची सबळ पुराव्याअभावी प्रस्तुतच्या गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली.
सदकामी यात संभाजी मधु कोकरे यांचे तर्फे अॅड.एस.एस पुजारी, अॅड. सोमनिंग पुजारी, अॅड. अभिषेक देवकते, अॅड. प्राजक्ता पुजारी, अॅड. संजीवनी चुंबळकर तसेच संदीप हौसेराव शेळके यांचेकडुन अॅड संतोष माने तसेच सरकारतर्फे अॅड बेंडभर यांनी काम पाहिले.