शेळवे प्रतिनिधी तेज न्यूज
सनराईज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे, ही प्रशाला अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात नेहमीच अग्रेसर असते, प्रशालेत स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी, विविध सहशाले उपक्रम,होम मिनिस्टर,व्यक्तिमत्व विकास शिबिर, विज्ञान दिन, क्रीडा स्पर्धाचे यशस्वी आयोजन, तसेच सर्वात मोठे स्नेहसंमेलन,कवी संमेलन व्याख्यानमाला यांचे आयोजन होत असते.प्रशालेचे यश हे तेथील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आधारित असतो, प्रशालेत अनेक गुणवंत विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले असून महाराष्ट्र राज्याचे शिष्यवृत्ती परीक्षा, केंद्र शासनाची एन एम एम एस परीक्षा, या परीक्षांमध्ये शिष्यवृत्तीस पात्र झालेले आहेत, त्यातच भर म्हणून शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी प्रशालेने एक नाविन्यपूर्ण व पंढरपूर तालुक्यातील एकमेवद्वितीय विद्यार्थी उपयोगी उपक्रम हाती घेतला असून, पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रशालेमध्ये सैनिकी प्रशिक्षण अर्थातच सीटीसी पॅटर्न म्हणजेच कमांडो ट्रेनिंग कोर्स चे आयोजन करण्यात येणार आहे, त्याचे आज प्रशिक्षण डेमो व शुभारंभ समारोह अगदी उत्साहात पार पडला, भारतीय सैन्य दलाचे सेवानिवृत्त लेफ्टनंट नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे येथील कमांडो ट्रेनिंग कोर्सचे उच्चच प्रशिक्षित कमांडोज,यांच्या धाडसपूर्ण व उत्साहवर्धक नेतृत्वाखाली आज पासून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे. सनराईज पब्लिक स्कूल शेळवे प्रशाला पंचक्रोशीतील सैनिकी प्रशिक्षण देणारी पहिली प्रशाला म्हणून गौरवण्यात येत असून, प्रशालेत नवोदय, सैनिकी प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, व महत्वपूर्ण स्पर्धा परीक्षांची यशस्वी तयारी घेतली जाते,सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शेळवे गावचे मा.उपसरपंच किरण दादा गाजरे, खेड भाळवणी गावचे मा.उपसरपंच शहाजी पाटील, तुकाराम गाजरे,गणेश लोकरे,शेळवे गावचे युवा नेते गणेश गाजरे,सुरज गाजरे,समाधान नागटिळक, दिलीप पवार श्री.जावळे पाटील तसेच सर्व माता -पिता पालक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता..
संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे यांनी सदर पॅटर्न आपल्या प्रशालेत राबवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच,संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी सदर सैनिकी कोर्स शुभारंभ कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन गायकवाड यांनी केले.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्व पालक वर्गांना मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक विद्यार्थी हा सारख्या गुणवत्तेचा नसतो, कोणाकडे उपजत हुशारी असते तर कोणाकडे इतर गुणवत्ता असते,प्रत्येक विद्यार्थी इंजिनियर, डॉक्टर, आयएएस अधिकारी, कलेक्टर होऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थी प्राध्यापक,शिक्षक होऊ शकत नाही,असेही काही विद्यार्थी असतात ते इतर कला गुणांमध्ये पारंगत असतात, मग त्यामध्ये क्रीडा स्पर्धा वक्तृत्वकला वाद संवाद अशा अनेक गुणांसह अंगभूत चपळपणा,समयसुचकता शिस्तप्रिय असे अनेक गुण त्यांच्यामध्ये असतात, त्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज असते अशा विद्यार्थ्यांसाठी सैनिकी प्रशिक्षण, पोलीस भरती प्रशिक्षण, नाविकदल, हवाईदल, युद्ध कला, स्वसंरक्षण यासारख्या अंगभूत गोष्टीचे प्रशिक्षण दिल्यास त्याचा फायदा भविष्यामध्ये त्यांना नक्कीच होऊ शकतो, म्हणून आपल्या प्रशालेमध्ये अशा सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागव्यात,त्यांना शिस्त लागावी, विद्यार्थी मोबाईल पासून दूर होऊन, अभ्यास, कला क्रीडा मध्ये समाविष्ट व्हावेत,त्यांच्या मनामध्ये देशभक्ती निर्माण व्हावी, देश प्रेम निर्माण व्हावं,शरीरामध्ये, मन आणि मनगटात नवचेतना स्फूर्ती आणि उर्मी निर्माण व्हावी, म्हणून आपल्या प्रशालेत सैनिकी प्रशिक्षण कोर्स चे आयोजन करण्यात येत आहे,सदर संधीचा लाभ परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा .
आपल्या विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक दृष्ठ्या सक्षम बनवावे कारण सबंध पंढरपूर तालुक्यामध्ये सनराइज पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शेळवे हि एकमेव प्रशाला आहे कीं ज्यांनी सैनिकी प्रशिक्षण कोर्सचे आयोजन केलेलं आहे.
उपस्थित सर्व पालक, शिक्षण प्रेमी नागरिक, आजी माजी सैनिक यांनी प्रशालेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे अभिनंदन करून कौतुक केले.