मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज सुभाष मुळे
८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक गणेश हिरवे यांनी बेघर गोर गरीब वंचित मुलांना किराणा किट देऊन हा दिवस त्यांच्या कुटुंबासाठी आनंदी केला.
या मुलांचे पालक रोजंदारीवर काम करणारे असून ज्या दिवशी काम त्याच दिवशी पगार मिळणार, दिवसभर काम मिळाले नाही तर पगार नाही आणि उपाशी पोटी रात्र काढावी लागते.अशा कुटुंबांना याआधी सुद्धा हिरवे यांच्या परिवाराने किराणा किट, शैक्षणिक साहित्य, कपडे, खेळणी, दिलेली आहे.
प्रत्येक सण उत्सव आणि विशेष दिवशी काहीतरी चांगले करण्याचा हिरवे यांचा मानस असतो.त्यांच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.