सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रकाश झोतात न राहता समाजोपयोगी कार्य करणाऱ्या महिला व युवकांचा सत्कार करणे हे लायन्स क्लब चे कर्तव्य आहे असे प्रतिपादन लायन्स क्लब चे प्रांतपाल ऍड.एम. के. पाटील यांनी केले.
लायन्स क्लब सोलापूर मेट्रो च्या अधिकृत भेटी दरम्यान आय एम ए हॉल येथे आयोजित स्त्रीरत्न व युवारत्न पुरस्कार समारंभात श्री.पाटील बोलत होते. यावेळी मंचावर प्रांताच्या प्रथम महिला लायन महानंदा पाटील, प्रांत सचिव ला.डॉ.अभिजीत जोशी ,प्रांत खजिनदार महेश नळे , माजी प्रांतपाल डॉ. व्यंकटेश यजुर्वेदी ,लायन्स क्लब मेट्रोचे अध्यक्षा सौ शलाका कुलकर्णी ,क्षेत्रीय अधिकारी किरण कुलकर्णी ,क्लब सचिव विश्वनाथ आमणे, क्लब खजिनदार सौ रजिया शेख उपस्थित होते.
यावेळी महिला दिनानिमित्त राजेश्वरी भादुले, सौ अर्चना सलवारू, प्राचार्य सौ कीर्ती भोसले ,सौ अश्विनी तडवळकर, प्रमिला चोरगी यांचा स्त्री रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. युवा क्षेत्रात युवकांच्या उन्नतीसाठी रोजगार निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी श्री कृष्णात पाटील व युवराज माळगे यांना युवा रत्न पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या श्री वीर तपस्वी इंग्लिश मीडियम प्रशालेला सर्वांग सुंदर पुरस्कार देण्यात आला. कलाक्षेत्रात गायन संस्कृती जोपासणाऱ्या रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांच्या स्वर ध्यास संगीत विद्यालयास आदर्श कला मंदिर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय मराठी भाषा दिन व विज्ञान दिन निमित्ताने घेण्यात आलेल्या शैक्षणिक तक्ता स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली.
सदर पुरस्काराचा वार्षिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी ला.महबूब शेख, सुरेश कुलकर्णी , सुनिता कुलकर्णी ,निशिकांत वड्डेपल्ली, सौ ममता वड्डेपल्ली, सुजाता आमणे, सोमनाथ पवार ,श्रीमती वैशाली ताटी ,लव राठी,मनोज देवकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.रकिब खान यांनी केले.प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आय एम ए हॉल समोर वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.