पंढरपुरात शिवसेना ठाकरे गटाकडून आरएसएसचे भैय्या जोशी यांचा जोरदार निषेध
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे असे नाही,” असे वादग्रस्त विधान भय्याजी जोशी यांनी केले आहे.मराठी ही राजभाषा आहे जोशी यांचे हे वक्तव्य राजद्रोहात बसते. १०६ हुतात्म्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी बलिदान दिले ते हे ऐकण्यासाठी? बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार म्हणवणारे जे सत्तेत बसले आहेत ते त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी भय्याजी जोशी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
आज पंढरपुर तहसील कार्यालयाच्या प्रवेश दारात शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यानी व शिवसैनिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपुर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी बोलताना भैय्या जोशी यांच्यावर कारवाई करण्यास राज्य सरकार धजावत नसून भाषेवर आणि जाती जातीत तेढ निर्माण करून बटेंगे तो काटेंगे सारखे विधाने करणारे आज सत्तेत बसले आहेत.मात्र मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अवमान होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा प्रमुख सिद्धेश्वर कोरे,तालुका प्रमुख बंडू घोडके,उपतालुका प्रमुख समाधान गोरे,विभाग प्रमुख दिलीप उघडे,महावीर हाळे,शाखा प्रमुख नामदेव चव्हाण,विभाग प्रमुख भारत कदम,युवासेना विभाग प्रमुख युवराज गणेश,गट प्रमुख नागनाथ देडगे,शाखा प्रमुख कल्याण कदम,नागनाथ देंडगे,नितीन थिटे,अमोल पवार,दत्तात्रय पाटील,सचिन खुटाळे,अजिंक्य गोसावी,महावीर हाके,मनोज कदम,विकी जाधव,उपतालुका संजय घोडके,समाधान गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.