सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
ड्रीम फाउंडेशनच्या वतीने होळीनिमित्त आणि जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी चे अध्यक्ष लायन मोहन भूमकर, सौ. डॉक्टर अर्चना खारे, सौ. स्मिता राठी, सौ. उज्वला देवधर, डॉक्टर शैलेश पटणे, ड्रीम फाउंडेशन चे अध्यक्ष सो स्वप्नाली इंगळे, उपाध्यक्ष आयेश शेख, सचिव अइस शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिलांना महिला आरोग्य विषयी मार्गदर्शन डॉक्टर अर्चना खरे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी लायन्स क्लब सोलापूर सिटी चे अध्यक्ष लायन मोहन भूमकर यांनी महिलांचे संस्कार हे समाजापुढे आदर्श असावे आणि निर्भय असावे.असे गौरवशाली मत मांडले. महिलांचे सत्कार शुभेच्छा दिले.
ड्रिम फाउंडेशनचे अध्यक्ष यांनी सर्व सन्माननीय प्रमुख पाहुण्यांचे सत्कार केल. आभार एम एजाज शेख यांनी केले.