सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
८, मार्च जागतिक महिला दिनानिमित्त उमेदपूर क्राईस्ट चर्च येथे डॉ. डायना आडके यांचे महिलांच्या आरोग्याच्या समस्या व उपचारा विषयी व्याख्यान संपन्न झाले. व्याख्यानादरम्यान त्यांनी महिलांचे दैनंदिन आरोग्य विषयक समस्या व त्यावर उपाय , कॅन्सर मुक्त अभियान याविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. महिला या कुटुंबाच्या प्रमुख घटक व पाया असतात त्यामुळे त्यांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी प्रसन्ना सिस्टर यांनी प्रबोधनात्मक धार्मिक व्याख्यान दिले. या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या कार्यक्रमाचे आयोजन उमेदपूर क्राईस्ट चर्चेचे रेव्हरंट फादर विकास रणसिंगे , रेव्हरंट सियोना रणसिंगे, अध्यक्ष प्रियांका गुंजे, सचिव आशा गुंजे यांनी केले होते. या कार्यक्रमास शर्मिला लाल, संगीता जाधव, सुनीता जाधव ,सारा जाधव, वंदना गुंजे, मीरा गुंजे, रीना गुंजे, महिमा गुंजे ,कामाक्षी जाधव ,स्नेहल जाधव, संगीता सिस्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.